Posts

Showing posts from January, 2018

Amin Sayani - Geetmala ki Chhaon Mein

अभ्यंकर ताईच्या आईचे काही दिवसांपूर्वी निधन झाले। त्या पूर्वी काही काळ अगोदर त्यांच्या एकुलत्या एका भावाचे निधन झाले। तसे पाहिले तर माज्यासाठी या दोन्ही घटना साधारणच होत्या। पण कालच ताईनी या दोघांच्या संग्रहातील काही सीडी मला दिल्या। त्यांचा तो अफलातून संग्रह पाहून मी चकितच झालो। जुन्या काळातील रफ़ी, लता, मुकेश, मन्नाडे, आशा भोसले अशा कितीतरी कलाकरांच्या आठवणी त्या सीडीत होत्या. त्यातील एक सीडी मला खूपच भावली---- ती  सीडी होती --अमिन सायानी यानी सदर केलेली गीतमाला। खंड ६-१० अश्या एकूण ५ सीडी होत्या त्यात. १९५६ ते १९५८ या काळातील भारतीय फिल्म संगीत, काही अजरामर गाणी, त्याच्या काही आठवणी, काही फ़िल्मी कलाकारांचे  आवाज ---सगळे अफलातून. आज दिवसभर फ़क्त त्या  सीडी ऐकतोय--- खूपच मजा आली आज. धन्यवाद ताई. खुप अनमोल खजिना मला तुम्ही दिलात। तुमच्या भावाप्रमाणेच मी हा खजिना जपून ठेवीन।